डिपफेक व्हिडिओ काय आहे आणि तो कशा प्रकारे ओळखायचा? त्याविरुद्ध कोणते उपाय आहेत?

आजकाल आपण अनेक वायरल व्हिडिओ पाहत असतो. पण कधी कधी हे व्हिडिओ खरे नसतात. ते कृत्रिमरित्या बनवलेले असतात. अशा व्हिडिओंना डिपफेक व्हिडिओ म्हणतात.

डिपफेक व्हिडिओ बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि मशीन लर्निंगचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीची छायाचित्रे किंवा व्हिडिओ घेऊन त्यात बदल करून एखादी वेगळी कल्पना तयार केली जाते.

उदाहरणार्थ, कोणत्याही राजकीय नेत्याचे वक्तव्य घेऊन त्यात बदल करून तो वेगळेच काही बोलत असल्याचे दाखवले जाऊ शकते. किंवा कोणत्याही अभिनेत्याची छायाचित्रे वापरून तो वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत दाखवला जाऊ शकतो.

अशा प्रकारे डिपफेक व्हिडिओ खरे दर्शवू शकत नाहीत. पण ते इतके प्रभावी असतात की ते खरे वाटू लागतात. त्यामुळे अनेकदा ते चुकीच्या माहितीचे प्रसारण करून गैरसमज निर्माण करतात.

डिपफेक व्हिडिओ शोधणे कठीण असले तरीही काही गोष्टींकडे लक्ष देऊन ते शोधता येतात:

1.चेहऱ्यावरील हालचाली अस्वाभाविक वाटत असेल तर

2.आवाज आणि हालचालीमध्ये सिंक नसेल तर

3.व्हिडिओ क्वालिटीमध्ये थोडा फरक असेल तर

जर तुमचा अश्या प्रकारचा विडिओ किंवा फोटो कोणी वायरल केला असेल तर तुम्ही जवळच्या सायबर क्राइम ला तक्रार नोंदवू शकता. तसेच या www.stopncii.org वेबसाईट सुद्धा Case Create करा त्यामुळे तुमचे डिपफेक व्हिडिओ आणि फोटो डिलिट होतील.

अशा गोष्टी लक्षात घेऊन डिपफेक शोधण्याचा प्रयत्न करावा. नेहमी माहितीची खात्री करूनच पुढे पाठवावी.